स्थापना
सन १९२४
पत्ता
२१६ मंगळवार पेठ, धनीणीची बाग, सातारा
संपर्क
८८०६८८६२२५
परंपरा आणि वारसा
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक ती. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपल्या शैक्षणिक कार्याची सुरुवात वसतिगृहयुक्त शिक्षणाने केली. सर्व जाती-धर्मांच्या मुलांसाठी सातारा येथे १९२४ साली सुरू केलेले पहिले वसतिगृह. एक हरिजन विद्यार्थी घेऊन त्यांनी या वसतिगृहाची सुरुवात केली. आधुनिक भारतातील हा शिक्षणाचा पहिलाच प्रयोग होता.
साताऱ्याचे शाहू महाराज यांनी त्यांच्या मालकीची सातारा येथील धनीणीची बाग १९२७ साली संस्थेस शैक्षणिक कार्यास दान देऊन दिली. या जागेवरच आज बोर्डिंग दिमाखात उभे आहे.
महात्मा गांधींचे शुभहस्ते नामकरण
"२५/२/१९२७ रोजी महात्मा गांधींनी या वसतिगृहास भेट दिली आणि 'श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस' असे नाव दिले."
पहिली आर्थिक ग्रँट
महात्मा गांधी यांनी सन १९३३-३४ मध्ये या वसतिगृहास रु. ५०० ची पहिली ग्रँट देऊन कार्याचा गौरव केला.
इफिशियन्सी ग्रँट
मुंबई सरकारने या वसतिगृहास १० वर्षे वार्षिक रु. १२००/- खास कार्यक्षमतेचा अनुदान (इफिशियन्सी ग्रँट) दिले.
या वसतिगृहास महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, ठक्करबाप्पा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो केशव कर्वे यांसारख्या थोर नेत्यांनी व समाजसुधारकांनी भेट देऊन गौरविले आहे.
सौ. लक्ष्मीबाई पाटील (वहिनींचा त्याग)
१९२४ पासून १९३५ पर्यंत कर्मवीरांनी देणग्यांतून हे वसतिगृह चालविले. रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई पाटील यांनी स्वतःचे सर्वस्व वाहून घेतले. आपल्या अंगावरील मंगळसूत्रासह सर्व दागिने या शैक्षणिक कार्यासाठी खर्च केले. त्यांच्या या त्यागामुळेच रयतचा वटवृक्ष आज डोलत आहे.
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी 'आधार'
सन २०१६ पासून रयत शिक्षण संस्थेने या वसतिगृहाचे पुनर्निर्माण केले. विदर्भ, मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना पदवी पर्यंतचे मोफत शिक्षण दिले जात आहे.
३३
सहभागी मुले
५ वी ते पदवी
शैक्षणिक स्तर
पूर्णतः मोफत
खर्च
वसतिगृहाची वैशिष्ट्ये व सोयीसुविधा
आहार
पौष्टिक, परिपूर्ण पोटभर अन्न, फळे, दुग्धजन्य पदार्थ.
वस्त्र
शालेय गणवेश, स्वेटर, कानटोपी व आरोग्य सुविधा.
निवारा
उत्तम निवासाची सोय, गादी, बेडशीट व गरम पाणी.
शिक्षण
स्कूलबॅग, वह्या-पुस्तके व अभ्यासिका सोय.
AI तंत्रज्ञान
संगणक शिक्षण व AI तंत्रज्ञान युक्त शिक्षणाची सोय.
क्रीडा
प्रशस्त क्रीडांगण, जिम व खेळाचे साहित्य.
कला
चित्रकला, वक्तृत्व व सर्वांगीण विकासाचे उपक्रम.
संस्कार
संस्कार वर्ग, विविध सण व जयंती साजरी करण्याची सोय.
शाहू बोर्डिंगचे आदर्श माजी विद्यार्थी
मा. आप्पासाहेब भाऊराव पाटील (संचालक, रयत)
मा. बॅरि. पी. जी. पाटील (कुलगुरू)
मा डी ए बरकडे (अति. पोलीस कमिशनर)
मा एल बी भिंगारदेवे (माजी वि. सदस्य)
मा. इस्माईलसाहेब मुल्ला (माजी मानद सचिव)
मा. मदन ढेरे (अध्यक्ष, माजी वि. संघटना)
... आणि अनेक क्षेत्रात चमकणारे हजारो गुणवंत विद्यार्थी.
बोर्डिंग हाऊस गॅलरी





प्रवेश व मार्गदर्शक माहिती
११ मे पासून १५ जुलै पर्यंत नवीन प्रवेश सुरू राहतील.
* मर्यादित जागा, प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य.
मुख्य अधिकारी
श्री प्रशांत गुजरे
अधीक्षक | ८८०६८८६२२५
मार्गदर्शक नेतृत्व
- • मा. डॉ. अनिल आप्पासाहेब पाटील साहेब
- • मा. श्री चंद्रकांत दळवी साहेब (IAS निवृ.)
- • मा. श्री देशमुख साहेब (IAS निवृ.)
- • व रयत शिक्षण संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी

