Rayat Shikshan Sanstha Logo

रयत शिक्षण संस्था

"स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद" - कर्मवीर

ध्येय आणि उद्दिष्टे

१. रयत शिक्षण संस्थेची प्रमुख उद्दिष्ट्ये

  • १.

    भारतातील उदयोन्मुख पिढीला आणि विशेष करून महाराष्ट्रातील रहिवाशांना उदात्त व व्यावसायिक शिक्षण प्राथमिक ते विद्यापीठ स्तरापर्यंत देणे. ज्यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक, तांत्रिक, शेती, व्यापार, औद्योगिक, शारीरिक प्रशिक्षण यांचा अंतर्भाव असेल.

  • २.

    वरील हेतूसाठी योग्य शिक्षकांना प्रशिक्षण देणे.

  • ३.

    गाव कामगारांना गावाच्या उन्नतीसाठी व ग्रामीण उद्योगासाठी प्रशिक्षित करणे.

  • ४.

    संस्थेच्या ध्येय धोरणानुसार व परिस्थितीजन्य निर्णयानुसार मोफत ग्रंथालये, वाचनालये, वसतिगृहे, निवासी व सर्वसाधारण शाळा, महाविद्यालये व अन्य संस्था सुरू करणे.

  • ५.

    वरील ध्येय धोरणाच्या अधीन राहून सर्व कायदेशीर बाबी व नियम करणे.

२. स्वावलंबन तत्त्व

स्वावलंबन तत्वातून रयत शिक्षण संस्था गरजूंना "कमवा व शिका" या योजनेच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधा पुरवेल. संस्थेचे कामकाज लिंग, धर्म, प्रदेश, जात, वंश, वर्ण हे भेद न करता व शक्य तेथे शिक्षण फी न घेता द्यावेत.

३. अराजकीय धोरण

संस्था अराजकीय असेल. व्यवस्थापन समिती सदस्य, आजीव सदस्य, शिक्षक, नोकर हे राजकीय बाबींमध्ये सहभागी होणार नाहीत. संस्थेचे विद्यार्थी राजकारणात सक्रिय सहभाग घेणार नाहीत ते त्यांच्या शिक्षणावर निष्ठा ठेवतील.