इ. ४ थी ते ९ वी एकूण १८ पेपर, ज्युनि. कॉलेज व डि एडकॉलेज २ पेपर व सिनीअर कॉलेज १ पेपर असे एकूण २१ पेपर विविध प्राश्निकांच्याकडून तयार करून घेवून त्याची प्रुफ करून छपाई झालेवर विभागीय कार्यालयामार्फत सर्व शाखांना पाहोच करून परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षेस यावर्षी १ लाख ८० हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. तसेच मराठी माध्यमाबरोबर इंग्रजी स्टेट बोर्ड व इंग्रजी सीबीएससी बोर्ड माध्यमांचे वरील प्रत्येकी २१ पेपर तयार करून परीक्षा घेण्यात येते.
इ.५ वी, ८ वी, ११ वी व शिक्षण सेवक एकूण ३ पेपर व इंग्रजी माध्यमाचे ३ पेपर विविध प्राश्निकांच्याकडून तयार करून घेवून त्याची प्रुफ करून छपाई झालेवर विभागीय कार्यालयामार्फत सर्व शाखांना पाहोच करून परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षेस यावर्षी ७० हजार विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते, तसेच मराठी माध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमांचे पेपर हि तयार करून परीक्षा घेण्यात येते.